BHR Scam | बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला अटक

BHR Scam | suspected in bhr scam jitendra kandare arrested by police in yerwada
पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – भाई हिराचंद रायसोनी संस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणातील (BHR Scam) तत्कालीन अवासायक जितेंद्र कंडारे (Jitendra Kandare) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. कंडारे याच्यावर शिक्रापूर (Shikrapur) येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यात (BHR Scam) येरवडा कारागृहात (Yerawada Jail) कंडारे याला ठेवले होते. जामिनावर मुक्तता होण्याआधी त्याला पोलिसांनी येरवडा कारागृहातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरज बनगर (Police Inspector Suraj Bangar) यांनी दिली.

याप्रकरणी संतोष काशिनाथ कांबळे Santosh Kashinath Kamble (रा. लोहगाव, पुणे) यांनी 25 नोव्हेंबर 2020 रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur police station) फिर्याद दिली होती. संतोष कांबळे यांचे वडिल शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पैसे कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील बीएचआरच्या पतसंस्थेत गुंतवले होते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मुदत संपल्यानंतर 18 लाख रुपये काढण्यासाठी गेले असता बीएचआर संस्था (BHR Scam) बंद पडल्याचे समजले. यानंतर कांबळे हे जळगाव येथे मुख्य शाखेत गेले असता कंडारे यांनी केंद्र सरकारने (Central Government) मला नेमले असून कागदपत्रे सही करा. तुम्हाला वीस टक्के रक्कम देऊ आणि उर्वरित 80 टक्के रक्कम बाबत विचारणा केली असता कंडारे यांनी धमकी (Threat) दिली होती.

 

 

Web Title :- BHR Scam | suspected in bhr scam jitendra kandare arrested by police in yerwada

 

 

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ! 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून

 

Modi Government | मोदी सरकार दरमहिना देतंय 3000 रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल तुम्हाला?

 

Mumbai High Court | हाय कोर्टाचा निर्वाळा ! आत्महत्येनंतर तब्बल 29 वर्षांनी मिळाला माय-लेकीला न्याय; पतीला ठोठावली शिक्षा

 

Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना सुरू करण्यावर निर्णयाची अपेक्षा, संसदेत मंत्र्यांनी सांगितले कुठे अडकले प्रकरण; जाणून घ्या

 

Mobile Earphone Side Effects | ईयरफोन वापर करत असाल तर व्हा सावध ! ‘इतके’ तास ऐकली गाणी तर ‘निकामी’ होतील कानांच्या नसा !