बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्लीः वृत्तसंस्था:कर्नाटकची राजधानी बेंगळुरू(BENGALURU) येथे रविवारी एका 30 वर्षीय कामगाराने एका व्यक्तीवर चाकूने वार करुन त्याची हत्या केली आणि 6 जणांना जखमी केले. पोलिसांनी(BENGALURU)ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपी गणेश सकाळी आठच्या सुमारास अंजनप्पा गार्डनमध्ये विनायक थिएटरजवळील मटणाच्या दुकानात गेला आणि तेथून चाकू चोरून फरार झाला. त्यानंतर, तो रस्त्याभोवती फिरताना आसपासच्या लोकांवर चाकुने वार करत पळून गेला. ” जखमी कामगारांपैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर दुसर्या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याला आयसीयूमध्ये दाखल केले गेले आहे.
मृत व्यक्तीची ओळख 30 वर्षीय दैनंदिन वेतन कामगार मारी आरच्या रुपात झाली आहे. त्याचवेळी या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर लोकांची नावे वलयुधाम, राजेश, सुरेश, आनंद आणि प्रकाश अशी आहेत. वलयुधामची परिस्थिती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशने सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या अंजनाप्पा गार्डन, बक्षी गार्डन आणि बालेकई मंडईच्या दिशेने चालताना विनाकारण लोकांवर चाकुने हल्ला करुन तेथे दहशत पसरवली. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर निरीक्षक व हवालदार घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याचा चाकू जप्त केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘पीडितांपैकी कोणीही गणेशला ओळखत नव्हते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा आरोप आरोपीच्या कुटुंबीयांनी केला आहे. आम्ही मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहोत.’