माजलगाव : बहुजननामा ऑनलाईन – Beed Crime News | आज सकाळी साडेदहाच्या सुमारास माजलगाव येथील भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर शाहुनगर या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाजप नेते अशोकराव शेजुळ हे स्कूटीवरून जात असताना शाहूनगर येथे मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर रॉडच्या सहाय्य्यने हल्ला केला. हल्लेखोरांनी रॉडच्या साह्याने त्यांच्या हातापायावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा पाय मोडला असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
यानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
या हल्ल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. शेजुळ यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला.
त्या ठिकाणी जाऊन पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी शेजुळ यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे.
Web Title :- Beed Crime News | attack on bjp leader ashokrao shejul by unknown persons beed crime news
हे देखील वाचा :
PMPML Strike | पीएमपी कंत्राटदारांचा संप मागे, बस सेवा पूर्ववत; पुणेकरांना दिलासा