मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics | आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election-2024) भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलं आहे. ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) पंतप्रधानपदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. याच दरम्यान संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा असल्याचे विधान केले. त्यांच्या विधानावर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी ट्विट करुन खोचक टोला लगावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंबंधीचं ट्विट केलं असून ते ट्विट सध्या व्हायरल होत आहे. देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घाता हे ट्विट केलं आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना मानो होली (Holi) है “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची, अशा खोचक शब्दात संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.
भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.भंकस वाटली असेल तर माफ करा "पण बुरा ना मानो होली है "आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 7, 2023
संजय राऊत एक कारकून
संजय राऊतांच्या विधानावर (Maharashtra Politics) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट
(Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत हे रोज काही ना काही नवीन विधान करत असतात. हा त्यांचा छंद आहे.
उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करणारे संजय राऊत कोण आहेत? मुळात संजय राऊत हा एक कारकून आहे.
तो काय उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करेल.
याबाबत उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील जे महत्त्वाचे नेते आहेत, ते ठरवतील.
मला पूर्ण विश्वास आहे की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
त्यामुळेच तो नको ती बडबड करतो, असे शिरसाट म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Politics | mns leaders sandeep deshpandes criticized tweet on sanjay raut statement uddhav thackeray be the face of pm post in 2024 big statement
हे देखील वाचा :
PMPML Strike | पीएमपी कंत्राटदारांचा संप मागे, बस सेवा पूर्ववत; पुणेकरांना दिलासा