नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन वर्ष अगोदर एटकिन नावाच्या एका युवतीने आपली तब्येत जास्त असल्यामुळे लग्नासाठी आलेले स्थळ नाकारले होते. त्यावेळी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे म्हणणे होते की, जंक फूड जास्त खाल्ल्याने ती जास्त जाड झाली आहे, असे म्हणत जेनसोबत सगळे संबंध तोडून टाकले. पण त्यांनतर एटकिनने जे काही केले ते खूप आश्चर्यचकित करणारे आहे.
ब्रेकअपनंतर जेनच्या आयुष्यात या गोष्टीचा खूप प्रभाव पडला. ती खूप निराश राहू लागली. तर दुसरीकडे तिने स्वतःला बदलण्याचा निर्णय केला. तिने असा निणर्य घेतला की ज्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही धडा मिळेल. अनके लोकांनी याला ‘अल्टिमेट रिवेंज’चे नाव दिले.
जेनने खूप प्रयत्न करत स्वतःला फिट बनवले. इतकेच नाही तर सौन्दर्य स्पर्धेतही भाग घ्यायचे ठरवले आणि मिस ग्रेट ब्रिटनचा किताबही आपल्या नावावर केला. एव्हिएशन एडमिनिस्ट्रेटरचे काम करणारी २६ वर्षांची जेन उल्सबी येथे राहत असून तिने हेल्दी डाएट सोबत पूर्ण लक्ष दिले आणि दोन वर्षातच स्वतःला चांगलेच फिट बनवले.
जेनने सर्वात अगोदर Miss Scunthorpe चा ‘किताब आपल्या नावावर केल्यांनतर २०१८ मध्ये मिस इंग्लंडच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेली. पण तिथे तिला नशिबाने जास्त साथ दिली नाही. पण त्या स्पर्धेत ती उपविजेती ठरली. या स्पर्धेनंतर तिने जरा ब्रेक घेतला. नंतर पुन्हा ७५ व्या मिस ग्रेट ब्रिटन स्पर्धेत भाग घेतला आणि हा ‘किताब आपल्या नावावर केला.