बहुजननामा ऑनलाइन – Beard Hair Care Tips | केस गळण्याची समस्या पुरुषांसोबतच महिलांमध्येही आढळते, परंतु केस गळण्याव्यतिरिक्त अनेक वेळा पुरुषांच्या दाढीचे केसही गळू लागतात. अशावेळी दाढीचे केस गळण्याचे थांबवणे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक काम होते. तुमची इच्छा असल्यास, काही सोप्या पद्धतींच्या मदतीने तुम्ही दाढीचे केस गळणे थांबवू शकता. दाढीचे केस गळण्याची कारणे आणि ते थांबवण्याचे उपाय जाणून घेऊया. (Beard Hair Care Tips)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दाढीचे केस गळण्याची कारणे :
1. अनुवांशिक
2. बुरशीजन्य संसर्ग
3. टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता
4. केमोथेरपी
5. ऑटोइम्यून रोग
6. प्रोटीन आणि झिंकची कमतरता
7. स्वच्छता, देखभालीचा अभाव
दाढीची केस गळती थांबवण्यासाठी करा हे उपाय
1. व्हिटामिन्स आणि मिनरल्सचे सेवन करा :
काही वेळा शरीरातील व्हिटामिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळेही दाढीचे केस गळतात. अशावेळी डाळी, अंडी आणि हिरव्या भाज्या यांसारखी व्हिटामिन्स आणि मिनरल्सनी समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन करून तुम्ही दाढीचे केस गळण्याची समस्या मुळापासून दूर करू शकता. (Beard Hair Care Tips)
2. आवळा सेवन करा (Amla) :
आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. अशावेळी तुम्ही आवळा देखील आहारात समाविष्ट करू शकता. रोज आवळ्याचे सेवन केल्याने केस मजबूत आणि निरोगी राहतातच पण केसांमध्ये चमकही येऊ लागते.
3. दाढीचा मसाज (Beard Massage) :
दाढीचे केस गळणे थांबवण्यासाठी आणि दाढीचे केस मुळापासून मजबूत करण्यासाठी तुम्ही मसाज करून पाहू शकता. यासाठी आवळा पावडरमध्ये खोबरेल तेल मिसळून दाढीला लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. मोहरीचे तेल वापरा (Mustard oil) :
दाढीचे केस गळणे टाळण्यासाठी तुम्ही दाढीला मोहरीच्या तेलाने मसाज देखील करू शकता. यासाठी दाढीला मोहरीचे तेल लावा. नंतर हलक्या हातांनी दाढीला थोडा वेळ मसाज करा.
5. ड्रायफ्रूटचे सेवन करा (Dry Fruit) :
पोषकतत्वांनी युक्त असलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या दाढीचे केस गळणे थांबते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Beard Hair Care Tips | beard hair fall cause and solution at home
हे देखील वाचा :
Weight loss | 86 वरून 55 किलोची झाली ही महिला, हा व्हेजिटेरियन डाएट आणि वर्कआऊट प्लान केला फॉलो