केरळ : वृत्तसंस्था – बुधवारी संध्याकाळी झालेल्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने समाधानकारक कामगिरी केली आहे. या नगरपालिकेमध्ये भाजपाला विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यासा सुरुवात केली. दरम्यान, भाजपाने विजय मिळवलेल्या पलक्कड नगरपालिकेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम लिहिलेला बॅनर लावल्याने खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचे छायाचित्र असलेला पोस्टर लावला. त्यावर जय श्रीराम असे लिहिले. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. केरळमधील पलक्कड नगरपालिकेसह दोन नगरपालिकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. तर सुमारे २४ हून ग्रामपंचायतींमध्येही सत्ता मिळवली आहे. त्यानंतर नगरपालिकेच्या सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आम्ही काल रात्री भादंवि. कलम यू/एस १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरू झाला आहे आणि हा बॅनर लावणाऱ्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.