नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Banks Strike | बँकांच्या खासगीकरणाविरोधात (bank privatisation) पब्लिक सेक्टरमधील बँक कर्मचारी या महिन्यात दोन दिवसांचा संप (Banks Strike) करणार आहेत. केंद्र सरकार संसदेत बँकांच्या खासगीकरणाबाबत सादर करत असलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी हा संप करणार आहेत.
यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (UFBU) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर होत असलेल्या बँकिंग लॉ (अमेंडमेंट) बिल, 2021 च्या (banking law bill 2021) विरोधात 16 आणि 17 डिसेंबरला संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
हमने आंदोलन की शुरुआत में आगाह किया था कि अगला नंबर बैंकों का होगा। नतीजा देखिए, 6 दिसंबर को संसद में सरकारी बैंकों के निजीकरण का बिल पेश होने जा रहा है। निजीकरण के खिलाफ देशभर में साझा आंदोलन की जरूरत है । #StopPrivatization
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) December 4, 2021
काय म्हटले युनियनने
एका न्यूज एजन्सीनुसार ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशनचे (AIBOC) महासचिव संजय दास यांनी म्हटले की, पब्लिक सेक्टरमधील बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेला प्राथमिकता देणार्या क्षेत्रांचे नुकसान होईल आणि यामुळे बचत गट, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कर्ज प्रवाहावर सुद्धा परिणाम होईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी म्हटले, मागील 25 वर्षापासून AIBEA च्या बॅनरखाली आम्ही बँकिंग क्षेत्रात अशा सुधारणांना विरोध करत आहोत, ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे नुकसान करत आहेत. (Banks Strike)
राकेश टिकैट यांनी सुद्धा केले ट्विट
याबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सुद्धा ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, ते तर अगोदरपासूनच लोकांना सावध करत होते की, पुढील निशाणा बँका असू शकतात.
UFBU च्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फडरेशन (AIBOC), नॅशनल कन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) आणि बँक एम्प्लॉईज कन्फडरेशन ऑफ इंडिया (BEFI) चा समावेश आहे.
Web Title : Banks Strike | public sector banks to go on two day strike this month against privatisation
Malaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा पाण्यातील व्यायाम, व्हिडीओ व्हायरल