मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आजपासून (दि.२७ मार्च) देशभरातील बँका (Bank) सात दिवस बंद असणार आहेत. यामुळे लोंकाचे बँकेतील महत्वाचे कामे हे सर्व आटवड्यानंतरच होणार आहे. आर्थिक वर्ष समाप्ती आणि सुट्ट्या यामुळे २७ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत देशभरातील सर्वच बँका ७ दिवस बंद राहणार आहेत. तर यामध्ये फक्त ३० मार्च आणि ३ एप्रिल या दिवशी बँकेतील कामकाज सुरू राहणार आहे.
७ दिवस बँका बंद असल्याने
२७ मार्चला चौथा शनिवार आणि २९ मार्चला होळी यामुळे सुट्टी आहे. त्यानंतर ३० मार्च रोजी बँका सुरू असतील. फक्त पाटणा इथं यादिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर ३१ मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र,आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या (year ending) कामांसाठी बँक ग्राहकांसाठी बंद असणार आहे. १ एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानं बँकांमध्ये वार्षिक खाती बंद करण्याचे काम केलं जातं, त्यामुळं (Bank) ग्राहकांसाठी बंद असणार आहे.
तसेच, २ एप्रिलला गुड फ्रायडेची (Good friday) सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील. ३ एप्रिल रोजी शनिवारी बँका सुरू असतील. ४ एप्रिलला रविवार असल्यानं बँकांना सुट्टी असेल. अशा प्रमाणे ४ एप्रिलपर्यंत केवळ २ दिवस बँकेतील कामं ग्राहकांना करता येतील. या सुट्ट्यांमुळं ग्राहकांना बँकेत पैसे जमा करणं, काढणं हे व्यवहार करता येणार नाहीत. परंतु ATM, Mobile banking, ऑनलाइन बँकिंग सेवा या कालावधीत सुरू असणार आहे. जाणून घ्या कशा असणार सुट्ट्या.
बँकांच्या सुट्ट्यां –
२७ मार्च : महिन्यातला शेवट शनिवार
२८ मार्च : रविवार सुट्टी
२९ मार्च : होळीची सुट्टी
३० मार्च : यादिवशी बँका सुरु राहतील, मात्र पाटण्यातील बँक बंदच राहतील.
३१ मार्च : आर्थिक वर्ष संपत असल्यानं बँका ग्राहकांसाठी बंद.
१ एप्रिल : वार्षिक खाती बंद करण्याच्या कामामुळे सुट्टी
२ एप्रिल : गुड फ्रायडे सुट्टी
३ एप्रिल : यादिवशी बँका सुरु राहतील.
४ एप्रिल : रविवार/ईस्टर डेची सुट्टी