बहुजननामा ऑनलाइन – बँक ऑफ बडोदाने(bank of baroda) सणासुदीपूर्वी रिटेल लोन सादर करण्याची घोषणा केली आहे. होम लोन आणि कार लोनसाठी बँक ऑफ बडोदा(bank of baroda) सध्या लागू दरात 0.25 टक्के सूट देत आहे. याशिवाय, बँक प्रोसेसिंग शुल्क सुद्धा माफ करणार आहे.
बँक ऑफ बडोदाचे हेड आणि जीएम- मॉर्गेज अँड अदर असेट्स, एच. टी. सोलंकी यांनी म्हटले की, आगामी सणांच्या सीझनसाठी या रिटेल लोन ऑफरच्या सुरूवातीसह, आम्ही सध्याच्या विश्वासू ग्राहकांना भेट देण्याचा विचार करत आहोत आणि सोबतच बँकेच्या नव्या ग्राहकांना कार लोन घेतल्यास होम लोनच्या शिफ्टिंगवर आकर्षक प्रस्ताव सुद्धा देत आहोत. या ऑफर अंतर्गत व्याजदर सुद्धा कमी ठेवले आहेत आणि ग्राहकांना प्रोसेसिंग फीमधून सूट देण्यात आली आहे.
पीनबीची नवी ऑफर
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह बोनांझा ऑफर घेऊन आली आहे. पीएनबीकडून जारी वक्तव्यानुसार, फेस्टिव्ह बोनांझा ऑफर अंतर्गत बँक आपले काही मोठे प्रॉडक्ट जसे की, होम लोन, कार लोन इत्यादीवर सर्व प्रकारचे अपफ्रंट, प्रोसेसिंग चार्ज आणि डॉक्यूमेंट चार्ज माफ करणार आहे.
ग्राहक या ऑफरचा फायदा पीएनबीच्या देशभरातील 10,897 शाखा किंवा डिजिटल चॅनलद्वारे 31 डिसेंबर 2020 पर्यंत घेऊ शकतात.
ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त आणि सोपे बनवण्यासाठी पीएनबीने नवीन आणि टेकओव्हर लोनवर सुद्धा प्रोसेसिंग फी कमी केली आहे. वक्तव्यानुसार, होम लोनवर ग्राहकांना आता लोनच्या रक्कमेच्या 0.35 टक्के (कमाल 15,000 रुपये) आणि डॉक्यूमेंट चार्जमधून सूट मिळेल.
अशाप्रकारे, कार लोनवर ग्राहकांची एकुण लोनची रक्कमेच्या 0.25 टक्के बचत होईल. अशाच प्रकारे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीच्या प्रकरणात ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या लोन रक्कमेच्या आधारावर सूट मिळेल.