बहुजननामा ऑनलाइन टीम – टीव्ही मालिका बालिका वधू (Balika Vadhu) मधून घराघरात पोहोचून ओळख मिळवणारी अॅक्ट्रेस अविका गोर (Avika Gor) हिला अखेर तिचं प्रेम मिळालं आहे. अविका सोशलवर काही रोमँटिक फोटो शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. तिनं(Balika Vadhu) हेही सांगितलं आहे की, ती आता कायमस्वरूपी त्याची झाली आहे. मिलिंद चंदवानी (Milind Chandwani) असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. फोटोत दिसत आहे की, अविका मिलिंद सोबत गोव्याच्या बीचवर रोमँस करत आहे.
अविकानं तिच्या इंस्टावरून फोटो शेअर करत एक पोस्टही लिहिली आहे. आपल्या या पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, माझ्या प्रार्थनांचं उत्तर मला मिळालं आहे. मला माझ्या आयुष्यातील प्रेम मिळालं आहे. आता विनम्र माणूस फक्त माझा आहे आणि मीदेखील कायमस्वरूपी त्याचीच आहे. आपल्या सर्वांना एका साथीदाराची गरज असते. जो आपल्याला समजून घेईल आणि विश्वास ठेवेल, मोटीवेट करेल, पुढं जाण्यास मदत करेल. खरं तर हे मला स्वप्नासारखं वाटत आहे. परंतु हे सत्य आहे. मी सर्वांसाठी प्रार्थना करते. मी देवाचेही आभार मानते. माझ्या जीवनातील हा सर्वांत महत्त्वाचा अध्याय असणार आहे असंही ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल लिहिली होती भावुक पोस्ट
अलीकडेच अविकानं इंस्टावरून साडीवरील काही फोटो शेअर केले होते. यासोबतच तिनं तिच्या संघर्षाबद्दलही चर्चा केली होती. यावेळी ती काहीशी भावुकही झाली होती.
अविकानं शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे. तिच्या या नवीन अध्यायाबद्दल तिचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या आहेत. फोटोंमध्ये तर हे कपल आणखी क्युट दिसत आहे असंही काही चाहत्यांनी म्हटलं आहे.
https://www.instagram.com/p/B9yjX5zgyY4/
https://www.instagram.com/p/B3ygMHOAjgv/
https://www.instagram.com/p/B3gna9igJ0w/