सांगली :-(प्रतिनिधी) – बहुजन रयत पार्टीची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आङे. यावेळी संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयावर व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०१९ प्रचारार्थ होणाऱ्या ऑगस्टमधील सभा,अन्य विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
रविवारी १४ जुलै २०१९ रोजी दुपारी ३ वाजता मिरज येथील शासकीय विश्रामगृह(पंढरपूर रोड) येथे ही बैठक पार पडणार आहे.
ही बैठक राज्य उपाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र प्रभारी) सतीश खामकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या बैठकीत माधव मेकेवाड महासचिव,महाराष्ट्र राज्य बहुजन रयत पार्टी यांचं ही मार्गदर्शन यावेळी सर्व पदाधिकारी यांना होणार आहे. अशी प्राथमिक माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.