नवी दिल्ली वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्या अनेक वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर १३ प्रकरणी चार्जशीट दाखल केली होती. त्यांनी अभिनेत्री व खासदार जयाप्रदा यांच्याबद्दल आणि भाजपाचे खासदार रमादेवी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याच्या अशा विधानामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सगळ्यांनी केली होती. अखेर त्यांनी लोकसभेत त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे माफी मागितली आहे.
SP Azam Khan in Lok Sabha: Meri aisi koi bhavna Chair ke prati na thi na ho sakti hai. Mere bhashan aur acharan ko sara sadan janta hai, iske bawjood bhi Chair ko aisa lagta hai ki mere se koi galti hui hai toh main uski kshama chahta hun. pic.twitter.com/2lMB07llyQ
— ANI (@ANI) July 29, 2019
लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात केल्यानंतर खासदार आझम खान यांनी माफी मागितली आहे. भाजपाचे खासदार रमादेवी यांनी म्हंटले की, आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य बंद केले पाहिजे. त्यांची वागणूक चांगली नाही. त्यांची बोलण्याची पद्धत चांगली नाही. आझम खान यांनी माझाच नाही तर देशातच्या प्रत्येक स्त्री-पुरुषाचा अपमान केला आहे. यानंतर त्याच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली.
SP Azam Khan in Lok Sabha: Meri aisi koi bhavna Chair ke prati na thi na ho sakti hai. Mere bhashan aur acharan ko sara sadan janta hai, iske bawjood bhi Chair ko aisa lagta hai ki mere se koi galti hui hai toh main uski kshama chahta hun. pic.twitter.com/2lMB07llyQ
— ANI (@ANI) July 29, 2019
ज्यावेळी लोकसभेत तिहेरी तलाक याविषयावर चर्चा सुरु झाली. त्यावेळी आझम खान यांनी वादग्रस्त विधान करण्यास सुरुवात केली. त्यांनी अभिनेत्री व खासदार जयाप्रदा यांच्याबद्दल देखील अश्लील टिप्पणी केली होती. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर १५ खटले दाखल झाले आहेत. पोलिसांनी चौकशी करुन त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अनेक वादग्रस्त विधानामुळे आझम खान हे अडचणीमध्ये फसत चालले आहे.