पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष माऊली हळवणर आणि तानाजी हळवणर या दोघांवर मंगळवारी प्राणघातक हल्ला झाला आहे. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, सावकारकीच्या व्यवहारातून हा प्राणघातक हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. पंढरपूरच्या ईश्वर वठार परिसरात हळवणर यांचं घर आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने घरात घुसून हळवणर यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्यामुळे माऊली आणि तानाजी हळवणर यांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या ते पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हा हल्ला अवैध सावकारकीच्या व्यवहारातून झाला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या माऊली आणि तानाजी यांना पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकाराची माहिती पंढरपूर पोलिसांना देण्यात आली असून, या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण यापूर्वी पंढरपूर तालुका पोलिसांनी जर हा गुन्हा दाखल करुन घेतला असता तर हा प्रकार टाळता आला असता असे बोलेल जात आहे. झालेल्या घटनेवरुन पोलीस आणि सावकार यांचे नाते कशा प्रकारचे आहे हे उघड झाले आहे.