बहुजननामा ऑनलाइन टीम – शहर पोलीस(Assistant Commissioner of Police) दलातील आज 5 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या(Assistant Commissioner of Police) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याबाबतचे आदेश काढला आहे.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
तर सुरेंद्रनाथ मधुकर देशमुख यांची वाहतूक शाखेतून गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. तसेच विजय चौधरी यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी चार सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तर आज 5 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.