मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे घराण्यातील चौथी पीढी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरली आहे. मुंबईमध्ये आज आदित्य नावाचाच गजर होताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघासाठी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मुंबईकरांनीही आदित्य यांचे जोरदार स्वागत केले आहे.
आदित्य यांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले आहे तसेच आदित्य यांचा पुढचा प्रवास कसा असेल याविषयी सारेच उत्सूक देखील आहेत. सेलिब्रिटींनी एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणं ही बाब आता नवी नाही. परंतु तुमच्या प्रचारालाचा खास बॉलिवूड सेलिब्रिटी येणार का ? या प्रश्नावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे काहीसे लाजले. कारण हा प्रश्न अप्रत्यक्षरित्या दिशा पाटनी संदर्भात होता.
आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की, “बॉलिवूड सेलिब्रिटी तुमच्या प्रचाराला येणार आहे का, ज्याच्यामुळे तुमच्या प्रचाराला वेगळी ‘दिशा’ मिळेल ? यावर आदित्य ठाकरे लाजे आणि म्हणाले की, आमचा सेलिब्रिटी हा शिवसैनिक असतो,” असं या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.
Visit : bahujannama.com