बहुजननामा ऑनलाइन टीम : भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने चार उमेदवराची यादी आज जाहीर केली असून एकनाथ खडसे अजूनही वेटिंगवर आहेत. अद्याप तीन जांगाचा प्रश्न सुटला नसल्याने त्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. रात्री उशीरापर्यंत यादी जाहीर होईल असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पहिल्या यादीमध्ये नाव नसल्याने एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये त्यांचे नाव येईल असे बोलले जात होते मात्र, दुसऱ्या यादीत देखील त्यांचे नाव आले नाही. भाजपने आज तिसरी यादी जाहीर करून खडसे यांना अद्याप गॅसवर ठवले आहे. भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी देणार नसल्याचे सांगून तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला तिकीट देऊ असे सांगून खडसे यांचा पत्ता कट केला आहे.. दरम्यान, खडसे यांच्या मुलीला तिकीट मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, तिसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये देखील खडसे यांच्या मुलीचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्क लढवले जात आहेत.
भाजपने आज जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे
1 रामटेक मधून मल्लिकार्झुन रेड्डी
2 मालाड पश्चिम मधून रमेश ठाकूर
3 साकोली मधून परिणय फुंके
4 शिरपूर मधून काशिराम पवरा
Bharatiya Janata Party has released third list of candidates for #MaharashtraAssemblyPolls. pic.twitter.com/3yGXRYzcql
— ANI (@ANI) October 3, 2019
Visit : bahujannama.com