मुंबई न्यूज (Mumbai News) :बहुजननामा ऑनलाइन – ASI Tukaram Ombale | 26/11 चे हिरो आणि दहशतवादी अजमल कसाबला (Terrorist Ajmal Kasab) पकडण्यात मदत करणारे असिस्टंट सब इन्स्टेक्टर तुकाराम ओंबळे (ASI Tukaram Ombale) यांच्या नावावर कोळ्याच्या एका नव्या प्रजातीचे (New species) नाव ठेवण्यात आले आहे. कोळ्याच्या या नवीन प्रजातीचे ना आयसियस तुकारामी ठेवण्यात आले आहे. संशोधकांच्या एका टीमकडून प्रसिद्ध एका पेपरमध्ये आयसियस तुकारामीचा सर्वप्रथम उल्लेख झाला.
ASI Tukaram Ombale | species of a spider found in maharashtra named after asi tukaram omble hero of 26 11 attack mumbai
या पत्राचा उद्देश महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोळ्याच्या मिळालेल्या दोन प्रजाती जेनेरा फिनटेला आणि आयसियसबाबत माहिती देणे आहे.
संशोधकांनी सांगितले की, या दोन्हीपैकी एका प्रजातीचे नाव आम्ही 26/11 मुंबई अटॅकचे हिरो असिस्टंट सब इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे यांच्या नावावरून ठेवले आहे.
त्यांनी पुढे म्हटले ओंबळे यांना 23 गोळ्या लागल्या होत्या आणि त्यांनी दहशतवादी अजमल कसाबला (Terrorist Ajmal Kasab) पकडून देण्यात मदत केली होती.
26/11 च्या रात्री सीएसटी रेल्वे स्टेशनवर (CST Railway Station) हल्ला केल्यानंतर,
अजमल कसाब आणि त्यांचा साथीदार इस्माइल खानने कामा हॉस्पिटलला टार्गेट केले.
हे दोन्ही दहशतवादी हॉस्पिटलच्या मागच्या दरवाजापर्यंत पोहचले आणि स्टाफने आतून सर्व दरवाजे बंद केले होते.
यानंतर दोघांनी हॉस्पिटलच्या बाहेर आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांवर हल्ला केला,
ज्यामध्ये एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह 6 जणांचा समावेश होता.
यानंतर कसाब आणि इस्माइल खान यांना गिरगाव चौपाटीजवळ रोखण्यात आले,
जिथे तुकाराम ओंबळे यांनी त्यांच्या रायफलची बॅरल पकडली.
तुकाराम ओंबळे यांच्या मुळे इतर पोलीस कर्मचार्यांना खुप वेळ मिळाला
आणि त्यांनी कसाबला जिवंत पकडले.
तुकाराम ओंबळ यांना पराक्रमासाठी मरणोत्तर अशोक चक्राने(Posthumous Ashoka Chakra) सन्मानित करण्यात आले.
Web Title : ASI Tukaram Ombale | species of a spider found in maharashtra named after asi tukaram omble hero of 26 11 attack mumbai
Edible oil price | खुशखबर ! स्वस्त झाले खाद्यतेल, मोहरी तेलासह घसरले सर्वांचे दर, पाहून घ्या यादी
Weather Alert | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता