बहुजननामा ऑनलाईन – बिग बॉसमुळे अभिनेत्री अर्शी खानला बरीच लोकप्रियता लाभली आहे. नुकतेच अर्शी विमानतळावर मीडीयाशी बोलत असताना अचानक एक चाहता तिच्याजवळ आला आणि तिच्याकडे फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. अर्शीने देखील चाहत्याला नाराज न करता फोटो काढण्यास तयार झाली. फोटो काढताना चाहत्याने तिला काही कळण्याच्या आत तिला किस करून निघून गेला. चाहत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी अर्शीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अर्शीला किस करुन गेलेला चाहता हा कोरोना रुग्ण होता का ? त्याच्यामुळे अर्शीला कोरोनाचा संसर्ग झाला का असे तर्क वितर्क लावले जात आहेत.
अर्शीला कोरोनाची लागण झाल्याचे तिने स्वतः सोशल मीडियावर सांगितले आहे. सध्या ती घरीच उपचार घेत आहे. दरम्यान अर्शी लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत. तिलाही योग्य काळजी घेण्यास सांगत आहेत. अर्शी खान सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. अर्शी खानचे इन्स्टाग्राम 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अर्शी आपल्या चाहत्यांसाठी रोज नवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अर्शी खानने बिग बॉसच्या 11 व्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. या सिझननंतर पुन्हा एकदा या सिझनमध्ये अर्शीला बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली होती.