बीड बहुजननामा : बीडमधील कडा भागातील गंगादेवी परिसरात खाजगी संस्थाचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेच्या शाळेतील एक महिला शिक्षिकेला अश्लील मॅसेज पाठविण्याच्या आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
अंकुश शिवाजी पालवे असे या आरोपीचे नाव आहे. अंकुश याची गंगादेवी येथे स्वतःची शिक्षण संस्था आहे. याच संस्थेच्या एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेत विवाहित शिक्षक महिला काम करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ६ महिन्यांपूर्वीच शाळेचा राजीनामा दिला होता. परंतु अंकुश हा संबंधित महिलेस सतत मोबाईल वरून अश्लील संदेश पाठवून त्रास देत असत.
सतत होणाऱ्या या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर गुरुवारी अंभोरा पोलीस ठाण्यात अंकुश याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे आणि राहुल लोखंडे करतील.