नवी दिल्ली : लैगिंक छळ केल्याप्रकरणी आसाम रायफलच्या एका मेजर जनरल ला निलंबित करण्यात आले असून त्याला कोणत्याही वेतन न देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी यासंदर्भात कारवाई केली आहे.
आरोपी मेजर जनरल विरोधात २०१६ मध्ये नागालँड मध्ये कार्यरत असताना लैंगिक छळ केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. डिसेंबर मध्ये आरोपीचं कोर्ट मार्शल झालं होत. त्यांनर जुलै मध्ये बिपीन रावत यांच्याकडून त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मेजर जनरल वर कारवाई करण्यात आली आहे, लष्कराने देखील या कारवाईस सहकार्य केले आहे.