बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून आलेल्या अधिकाऱ्यापैकी दोघांची आज नेमणूक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांची विशेष शाखेच्या प्रशासन एक याठिकाणी नेमणूक केली आहे. तर सुषमा चव्हाण यांची वाहतूक शाखेत नेमणूक केली आहे.
सुनील पवार यांची बुलढाणा येथून पुण्यात बदली झाली होती. ते हजर झाल्यानंतर त्यांची विशेष शाखेत नेमणूक केली आहे. तर सुषमा चव्हाण लाच लुचपत प्रतिबंधक विभागातून पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती. दरम्यान, पुणे शहरात जवळपास 7 सहाय्यक आयुक्तांच्या जागा रिक्त होत्या. काही अधिकारी निवृत्त झाले होते. तर काही जागी अतिरिक्त कार्यभार होता. पण गेल्या आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये गृहविभागाने 8 सहाय्यक आयुक्तांची पुणे शहर पोलीस दलात बदली केली आहे. काही अधिकारी हजर झाले आहेत. त्यानुसार नेमणूक करण्यात येत आहे.