API, PSI Suspended | अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित मुलीवर खुनी हल्ला; एपीआय, 2 पीएसआय, कॉन्स्टेबल तडकाफडकी निलंबित

Pune Police - PSI Suspended | Hasty suspension of police sub-inspector who took 50 thousand rupees from the accused

बार्शी/सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन API, PSI Suspended | अत्याचाराची तक्रार दिल्याचा (Minor Girl Rape Case) राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर घरात घुसून जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर आरोपींना तातडीने अटक (Arrest) न केल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यातील चार जणांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (Kolhapur IG Sunil Phulari) यांनी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्ष आणि एका हेड कॉन्स्टेबलचा (API, PSI Suspended) समावेश आहे. ही कारवाई बुधवारी (दि.8) केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे (API Maharudra Parjane), पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मंगरुळे (PSI Rajendra Mangarule), महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुल (PSI Sarika Gutkul), हेड कॉन्स्टेबल अरुण भगवान माळी (Arun Bhagwan Mali) अशी निलंबित (API, PSI Suspended) केलेल्या पोलिसांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणे, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कारवाई केली जाईल. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगितले.

 

काय आहे प्रकरण?
अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.6) रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर रविवारी (दि.5) दोघांनी अत्याचार केले होते. त्यानंतर मुलीने दोघांविरुद्ध रविवारी बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police Station) तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला होता.

 

दुसऱ्या दिवशी या गुन्ह्याच्या तपास कमाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई-वडील पोलीस ठाण्यात गेले होते.
त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी संशयित आरोपी अक्षय माने आणि सिद्धेशवर दळवी हे मुलीच्या घरी आले.
त्यांनी सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत झाली. तसेच हल्ल्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटे तुटली.

 

हल्ल्यात बेशुद्ध झालेल्या पीडित तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकारानंतर आरोपी माने आणि दळवी याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
या घटनेत संशयित आरोपींना तातडीने अटक न केल्यामुळे पोलीस ठाण्यातील चार जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- API, PSI Suspended | attack on abused young girl four suspended with api solapur police

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

Snehal Tarde | ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिलादिनानिमित्त 15 हजार फुटांवरून उडी! व्हिडिओ व्हायरल