मुंबई : बुहजननामा ऑनलाईन – अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांची कूल जोडी नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा अनुष्का शर्मा आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. अनुष्काने विंडिजच्या समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त पाण्याचा आनंद घेतला होता. त्यातील अनुष्काचा एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. विराटने यावर खास कमेंट केली आहे.
काही दिसवांपूर्वीच भारतीय संघ विंडिजमधील एका ठिकाणी गेला होता. तेथे खेळाडूंनी मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला होता. यात शिखर धवन, रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, श्रेयस अय्यर, निकोलस पूरन या खेळाडूंचा त्यात समावेश होता. अनुष्कानेही समुद्राच्या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यातीलच तिचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. खास बात म्हणजे अनुष्काने यात बिकीनी घातली आहे. वाळूत बसून अनुष्का पोज देताना दिसत आहे.
अनुष्काची ही पोस्ट केवळ तिच्या बिकीनीमुळेच खास ठरली नाही तर त्यावरील विराटची कमेंटही खास आहे. आपल्या कमेंटमुळे विराटही चर्चेत आला आहे. विराटने हार्ट आणि प्रेमाची इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. चाहत्यांनीही अनुष्काच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
विराटबद्दला सांगायचे झाले तर 22 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत तो खेळणार आहे. सध्या विंडिज अ संघाशी भारताचा सराव सामना सुरु आहे. यासाठी विराटाने मात्र विश्रांती घेतली आहे.