पुणे : बहुजननामा ऑनलाइन – परमिट रुमच्या लायसन्ससाठी (Permit Room License) लागणारी कागदपत्र संबंधित कार्यालयांकडून मिळवण्यासाठी त्यांना पत्र पाठवण्यासाठी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पुणे (Superintendent State Excise Office Pune) येथील शिपाई उत्तम किसन धिंदळे Peon Uttam Kisan Dhindale (वय – 45) आणि खासगी व्यक्ती विठ्ठल चव्हाण (Vitthal Chavan) यांना 5 हजाराची लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून अटक केली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई मंगळवारी (दि.12) करण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 25 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पडताळणी करुन आज (मंगळवार) सापळा रचून दोघांना अटक केली. तक्रारदार यांनी परमिटरूमचे लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) मिळण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे पत्र पोलीस आयुक्त कार्यालय (Police Commissioner Office) व वाहतूक शाखेला (Traffic Branch) पाठवण्यासाठी उत्तम धिंगळे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सोमवारी पडताळणी केली असता उत्तम धिंदळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. उत्तम धिंदळे याने लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती विठ्ठल चव्हाण याच्यामार्फत घेताना रंगेहाथ पकडले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijaymala Pawar),
पोलीस हवालदार अंकुश माने, चालक पोलीस कॉन्स्टेबल अभिजित राऊत यांनी केली.
Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Soldiers in the state excise office and private individuals in the anti corruption net
हे देखील वाचा :
Silver Oak Attack Case | ‘त्यांना’ ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याची माहिती होती’; भाजपचा खळबळजनक आरोप !
Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक
Pune Crime | गुन्हे शाखेकडून सोमवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा, आप्पा कुंभारसह 13 जणांवर FIR