नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खूप मोठी कारवाई केली आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) आज तब्बल 28 लाख रुपये लाच घेताना आदिवासी विभागाच्या (Tribal Division) एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Executive Engineer Dinesh Kumar Bagul) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) लाच घेताना अटक (Accepting Bribe) केली. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल (Central Kitchen Bill) मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या कारवाईत नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील (Tribal Development Department) बांधकाम विभागाचे अभियंता दिनेशकुमार बागुल यांना 28 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. दीड कोटी रुपयांचे बील मंजूर करण्यासाठी बागूल यांनी ठेकेदाराकडे (Contractor) रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे बागुल यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना बेड्या ठोकल्या. पथकाने 28 लाखांची लाचेची रक्कम जप्त केली.
दिनेशकुमार बागुल या अधिकाऱ्याकडे नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा संशय एसीबीच्या अधिकाऱ्यांना आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवस सापळा रचून ही कारवाई केली. गेल्या दोन दिवसात एसीबीने अनेक कारवाया केल्या आहेत.
मात्र, आजची ही कारवाई सर्वात मोठी आहे. नाशिकच्या आदिवासी विभागात कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या फाईल पडून असतात.
नाशिकचे आदिवासी विकास भवन हे केवळ नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी नसून संपूर्ण राज्याचं आहे.
येथून राज्यातील आदिवासी विकास विभागाचे कामकाज चालवले जाते.
Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nashik | Nashik acb arrest forrest officer executive engineer dinesh kumar baguldemanding 28 lakh bribe
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे