नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Nanded | दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने (Police Personnel) नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना चकमा देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी बिलोली तालुक्यातील (Biloli Taluka) कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या (Kundalwadi Police Station) हद्दीत घडली आहे. बीट जमादार तैनात बेग याला दोन हजार रुपये लाच घेत असताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Nanded) अधिकाऱ्यांनी पकडले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DYSP Rajendra Patil) यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी बेग याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्विकारून पैसे खिशात ठेवले. त्यावेळी नांदेड एसीबीच्या (Nanded ACB) पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले. एसीबीचा ट्रॅप लक्षात येताच बेग याने दुचाकीवरुन पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नांदेड एसीबीच्या पथकाने बेग याचा बराच पाठलाग केला. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
याप्रकरणी मध्यरात्री बेग याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act)
गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nanded | policeman caught taking bribe escapes from ACB
हे देखील वाचा :