नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बागपतमधील फजलपूर सुंदर नगर येथील रहिवासी अंशिका सिंह पोलिस भरतीसाठी घेतल्या जाणार्या शारीरिक चाचणीसाठी गेली होती. तेथे तिला 14 मिनिटांत 2.4 किमी शर्यत पूर्ण करून सहा राउंड मारायचे होते. अंशिकाने 13 मिनिटे आणि काही सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. मात्र त्यानंतर ती ट्रॅकवर बेशुद्ध होऊन पडली आणि तिथेच तिने जीव सोडला. सूचना मिळताच तातडीने एसपी ग्रामीण संसार सिंह, एसपी सिटी, पीएसी कमांडेंट विकास कुमार वैद्य, कमलेश बहादुर यांच्यासह इतर अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले. बाहेर थांबलेल्या अंशिकाच्या विडिलांसह इतर नातेवाइकांना तिची तब्बेत बिघडल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात अंशिकाला नेले असता तिचा चेहरा पाहून वडील मोठं मोठ्याने रडू लागले. अंशिकला दोन छोटे भाऊ देखील आहेत.
अचानक आला हार्टअटॅक
अचानकपणे हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टममध्ये समोर आल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. अशावेळेस लवकर सीपीआर दिला तर श्वास परत येऊ शकतो परंतु तो किती काळ राहील हे सांगणे कठीण आहे. जास्त कष्टदायी काम केल्याने देखील रक्तस्रावावर परिणाम होऊन हृदय बंद पडू शकते.
हॉकीपटूचा देखील असाच झाला होता मृत्यू
हॉकीपटू असलेल्या विनोद सिंह रावत यांचा देखील 2018 मध्ये असाच मृत्यू झाला होता. साई स्टेडियम मध्ये वर्कआउट करत असताना त्यांना अचानक ह्रदय विकाराचा झटका आला. विनोद नॅशनल हॉकीपटू होता आणि बिहारकडून खेळत होता.
फजलपुरमध्ये दुःखी वातावरण
अंशिकच्या जाण्याने संपूर्ण फजलपूरमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. अंशिकाची इच्छा होती की युपी पोलीसमध्ये भरती व्हावे तिचे वडील एक छोटे शेतकरी आहेत.
अंशिकाला कोणत्याही परिस्थिती भरती व्हायचे होते
1 मे 1999 मध्ये जन्मलेल्या अंशिकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये युपी पोलिसांत भरती व्हायचे होते. त्यासाठी ती रोज पळायचा सराव देखील करत होती. पोलीस भरतीसाठी 21 वर्षाची वयोमर्यादा आहे. अंशिकाला 21 वर्ष वय पूर्ण करण्यासाठी थोडेच महिने बाकी होते. त्यामुळे ही तिच्यासाठी शेवटची संधी होती.
Visit : bahujannama.com