बहुजननामा ऑनलाइन टीम – अल्पवयीन मुलीला (Minor Girl) दारु (liquor) पाजून ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरुन (Rape of a minor girl )गेले आहे. हा प्रकार डेक्कन (Deccan) परिसरात घडला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
साहिल महेंद्र तापकीर (वय-23 रा. दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या 16 वर्षी मुलीबरोबर आरोपी साहिल याची ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये नेले. त्या ठिकाणी मुलीला दारू पाजून बेशुद्ध केले.
मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी साहिलने तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.