Anil Parab | केंद्राने दिलेली मुदत संपल्याने मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाईची शक्यता

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब (Anil Parab) आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या सीआरझेड अंतर्गत येणारे या संपत्तीच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर याबाबत केंद्राने पर्यावरण खात्याच्या वतीने एक टीम पाठवून परब आणि नार्वेकर यांच्या संपत्तीची पाहणी केली होती. दरम्यान, परब यांनी बांधलेलं पंचतारांकित रिसॉर्ट तोडण्या बाबत यात कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे याबाबत सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याला (Central Environment Department) महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) माध्यमातून कारवाई करायची मागणी केलीय. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने कुठलीही कारवाई केली गेली नाही. असा आरोप सोमय्यांनी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, परब यांना हे बांधकाम तोडण्या करीता देण्यात आलेली मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या वतीने सदर बांधकाम तोडण्यात येण्याची शक्यता आहे, सोबतच अनिल परब यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कलमांतर्गत कारवाई देखील होऊ शकते असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.
Web Title :- Anil Parab | shivsena leader and minister anil parab will take action on dapoli resort case say bjp leader kirit somaiya
Magical Eye Drop | खुशखबर ! वैज्ञानिकांनी बनवला डोळ्यांसाठी चमत्कारी ड्रॉप, दूर होईल चष्मा !
Comments are closed.