संबलपूर : बहुजननामा ऑनलाइन – ओडिशातील संबलपूर विभागात हत्तीला धडक दिल्यानंतर पूरी -सुरत स्पेशल एक्सप्रेस रुळावरुन घसरली आहे. आज पहाटे २ वाजून ४४ मिनिटांनी हा अपघात झाला.
At around 2 am today, an elephant was killed after being hit by Puri-Surat Special Express Train. An inquiry has been initiated in this matter: Sanjeev Kumar, District Forest Officer, Sambalpur, Odisha https://t.co/GBaf7B5EgX pic.twitter.com/q0WFpuEX7f
— ANI (@ANI) December 21, 2020
पूरी -सुरत स्पेशल एक्सप्रेस सुरतकडे जात असताना पहाटे २ वाजून ४४ मिनिटांनी रुळ ओलांडणाऱ्या हत्तीला रेल्वेची धडक बसली. त्यात हत्तीचा मृत्यु झाला. त्यानंतर ही रेल्वे रुळावरुन घसरली असे पूर्व रेल्वे विभागाने सांगितले. हताबारी ते मानेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळाल्यावर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे. रेल्वेचे डबे रुळावर घेण्याच्या कामाबरोबरच हत्तीला बाजूला करण्यात येत आहे.