Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) या त्यांच्या गाण्याच्या शैलीतून प्रसिद्ध आहेत. खरंतर अमृता फडणवीस सोशल मिडियावर (Social Media) देखील अधिक सक्रिय असतात. दरम्यान त्या सध्या कान्स चित्रपट सोहळ्यामध्ये (Cannes Film Festival 2022) सहभाग घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी रेड कार्पेटवरील काही विशेष फोटो (Photo) समाज माध्यमावर शेअर केले आहेत.
कान्स चित्रपट सोहळ्यामध्ये भारतातील अनेकांनी हजेरी लावली आहे. या दरम्यान अमृता फडणवीस यांची उपस्थिती एक प्रकारे लक्षवेधी ठरली असल्याचे पाहायला मिळते. तसेच, या चित्रपट सोहळ्यामधील महत्वाचे म्हणजे या निमित्ताने अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी कान्सच्या रेड कार्पेटरवर हजेरी लावली आहे. याबाबत माहिती खुद्द अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
At #Cannes2022 #redcarpet –
Walked #CannesRedCarpet at #CannesFilmFestival2022 to raise awareness about food,health & sustainability along with-1st Lady of Cote D’ivoire Mrs Dominique Ouattara, Princess Ghida Talal,actor @sharonstone ,Kiera Chaplin,organised by #BetterWorldFund pic.twitter.com/3pprkOLWQv— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 25, 2022
अन्न, आरोग्य आणि निरंतरता याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बेटर वर्ड फंडने (Better Word Fund) आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये डाँमिनिक ओयुटारा (Dominic Oyutara), राजकुमारी धिदा तलाल (Dhida Talal), अभिनेता शारोन स्टोन (Sharon Stone), चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) यांची नात अभिनेत्री कायरा चॅप्लिन (Kyra Chaplin) यांच्यासहीत उपस्थिती लावली. दरम्यान, कान्स चित्रपट फेस्टीवलमधील अमृता फडणवीस यांचा सहभाग आणि रेड कार्पेटवरील त्यांच्या हजेरीची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरू झाली आहे.
या दरम्यान, या फिल्मच्या महोत्सवाचे हे 75 वे वर्ष आहे. म्हणून त्याची यंदा जगभरातील चित्रपट नगरीत चर्चा आहे. त्याचबरोबर कान चित्रपट सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी येथे दाखल झालेल्या अमृता फडणवीस यांनी विमानतळावरुनच (Airport) पोस्ट शेअर करत आपली उत्सुकता वक्त केली आहे.
Web Title : Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Comments are closed.