नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये जिल्हा प्रशासनाने ध्वनिपेक्षक लावण्यास बंदी घातली होती. ती बंदी उठवण्यास आता अलाहाबाद हायकोर्टाने नकार दिला आहे. दोन समाजांमधील वाद थांबवण्यासाठी कोणत्याही धार्मिक स्थळावर अशी उपकरणे न लावण्याचे आदेश उपजिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. पण तसे केले तर सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
जिल्हा प्रशासनाने दोन समाजातील वाद रोखण्यासाठी कोणत्याही धार्मिक स्थळावर ध्वनिपेक्षक लावू नका असे आदेश दिले होते. तसेच ध्वनिपेक्षकांवर अगोदरपासूनच बंदी होती. पण जौनपूरमधील बद्दोपूरमध्ये राहणाऱ्या मशरुर अहमद आणि मुस्लिम समाजातील इतर नागरिकांनी ही बंदी उठवण्यात यावी, अशी विनंती केली होती. परंतु अलाहाबाद हायकोर्टाने मात्र या बंदीचा आदेश कायम ठेवला.
मंदिर आणि मशिदीमध्ये ध्वनिपेक्षक लावण्यासंबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने उत्तर प्रदेशचे गृहसचिव, मुख्य सचिव आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रमुखांना नोटीस पाठवली होती. तसेच राज्य सरकारने ध्वनिपेक्षक वाजवण्याचे कोणाचे आदेश आहेत, असे विचारले होते. यानंतर सरकारने धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, मिरवणूका, सभा-सोहळ्यांमध्ये विनापरवानगी ध्वनिपेक्षक वाजवण्यावर बंदी आणली होती.
Visit : bahujannama.com