बहुजननामा ऑनलाइन : आपल्या ग्राहकांना सुरक्षिततेची हमी देणं , हे बँकेचं कर्तव्य आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना सुरु करत असते. त्यामुळे वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी सर्व्हिस आणि सुरक्षिततेसंबंधी सूचना देत असतात. दरम्यान एसबीआय ने ATM संदर्भात एक सूचना आपल्या वेबसाईट वर टाकली आहे. मागील वर्षांपासून SBI ने आपल्या डेबिट कार्ड मध्ये अनेक बदल घडवले आहे. त्यात मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड ला पूर्णपणे बंद केलं आहे.
चला जाणून घेऊया ATM शी निगडित काही प्रश्नांची उत्तरे ,
प्रश्न : मला माझ्या बँकेकडून ATM ब्लॉक करण्याचा संदेश मिळाला आहे. त्यात त्यांनी माझं ATM कार्ड रिप्लेस करण्यास सांगितले आहे. तो संदेश काही अश्या पद्धतीने आहे, SMS Your State Bank Debit Card ending XXXX is blocked on DD-MMM-YY at HH:MM’ Tkt No XXXXXXXXXXXXXXX. Apply for replacement Card at www.onlinesbi.com or home branch” What is this about? हा काय प्रकार आहे. ?
उत्तर : यावर SBI ने उत्तर असे दिली कि , बँकेने आपल्याला मॅग्नेटिक स्ट्रीप चे कार्ड वापरण्यास दिले होते. ते आता बंद करण्यात आले आहे. त्याबदल्यात बँक मोफत EVM कार्ड देणार आहे. आपण जवळच्या ब्रांचमध्ये किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे बदलू शकतो .
प्रश्न : मला कसे कळेल कि, माझे कार्ड नवे EVM वाले आहे.
उत्तर : SBI ने सांगितले कि , हे अत्यंत सोपे आहे, नवीन EVM कार्ड मध्ये तुम्हाला चिप उपलब्ध होईल तर जुन्या मॅग्नेटिक स्ट्रीप मध्ये ती सुविधा नसणार आहे.
तसेच SBI ने एक महत्वपूर्ण सूचना देखील केली आहे, कि हे माहिती इनक्रिप्टेड असते , जेणेकरून हि माहिती चोरी होणार नाही. EVM चिप कार्ड मध्ये ट्रांजैक्शन च्या वेळी तुम्हाला एक ट्रांजैक्शन कोड जनरेट होतो, जो वेरिफिकेशन ला सपोर्ट करतो . जुन्या कार्ड मध्ये हि सुविधा नव्ह्ती.