मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) बुधवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विधिमंडळ हे चोर मंडळ असल्याचे वादग्रस्त विधान केले. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गट (Shinde Group) – भाजप (BJP) आक्रमक झाली असताना भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा महाराष्ट्रद्रोह असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत असून हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र संजय राऊत खरोखरच बोलले का? हे देखील तपासण्याची गरज असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले आशिष शेलार
आशिष शेलार म्हणाले, संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिली. एखाद्याचा राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र या विधिमंडळाच्या अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विधिमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे.
विधीमंडळाला चोरमंडळ संबोधणाऱ्या संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग स्विकृत करुन कारवाई करा.@rautsanjay61 @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @RahulN_Office @CMOMaharashtra#BudgetSession2023 #MahabudgetSession #Maharashtra #MaharashtraPolitics #AshishShelar pic.twitter.com/Me4gN2fYYu
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 1, 2023
आशिष शेलार यांच्या मताशी सहमत
आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या.
आपण पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. कोणत्याही नेत्याला व्यक्तीला चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार नाही.
मी काही वेळापूर्वी यासंदर्भातील बातमी टीव्हीवर पाहिली. खरं तर आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे.
राजकीय मतभेद बाजुला ठेऊन हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे.
मात्र, संजय राऊत खरोखरच बोलले का?हे देखील पाहण्याची गरज आहे. ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ajit Pawar | ncp ajit pawar support bjp ashish shelar over thackeray group mp sanjay raut statement about vidhan sabha
हे देखील वाचा :
Pune Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांकडून अटक
Nana Patole | ‘विधीमंडळाचाच नाही तर जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही’ – नाना पटोले