पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस(Vaccine) देण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. परदेशातून लस(Vaccine) खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे. लस उत्पादक भारत बायोटेकच्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून दिली असून येथे लवकरच लसीचे उत्पादन होईल. तसेच पुण्यातील हडपसर येथे उभारलेले ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर हे जेष्ठ नागरिक व दिव्यांगांना सुलभ सेवा देणारे ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यातील हडपसर येथे उभारलेल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पवार म्हणाले की, राज्यासह पुणे शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज आहे. राज्य सरकारनेही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना देत आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पवार यांनी केले आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे
हेल्दी मनुष्याला सुद्धा होऊ शकतो हार्टअटॅक, जाणून घ्या कारणे आणि उपचार
‘मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय’