मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) जाणार असल्याच्या चार्चांना उधाण आलं आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी मी कुठेही जाणार नाही, राष्ट्रवादीच (NCP) राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरही चर्चा थांबताना दिसत नाहीत. तसेच संजय राऊत (MP Sanjay Raut) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असा सामना सध्या राज्यात रंगल्याचे पाहायला (Maharashtra Political News) मिळत आहे. अशातच भाजप खासदार अनिल बोंडेंनी (BJP MP Anil Bonde) एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अनिल बोंडे म्हणाले, संजय राऊत यांच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. शिवसेनेतील 40 आमदार (Shivsena MLA) फुटले ते संजय राऊत यांच्यामुळेच.अजित पवारही (Ajit Pawar) राऊत यांना कंटाळून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सोडतील. शिवसेना फोडण्यासाठी जसे राऊत जबाबदार आहेत. तसेच महाविकास आघाडी फोडण्यासाठी संजय राऊतच जबाबदार ठरतील. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरुनच अजित पवार यांना संजय राऊत महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, असा खळबळजनक दावा बोंडे यांनी केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बोंडे पुढे म्हणाले, आधी चाळीस आमदारांना बाहेर काढलं आता अजित पवारांनाही बरोबर आयडियाने बाहेर काढल जाईल. संजय राऊतांनी जसं सांगितलं आहे तसेच वागत आहेत. ते परवा म्हणाले, मी फक्त शरद पवारांच ऐकतो. आधी शरद पवारांच्या सल्ल्याने शिवसेना फोडली आता महाविकास आघाडी फोडतील. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने चाललं आहे. राज्यातील जनतेची करमणूक होत आहे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Ajit Pawar | bjp mp anil bonde serious allegation on sanjay raut he said ajit pawar will be kicked out from mva
हे देखील वाचा :