पुणे : बहुजननामा ऑनलाईन – एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar apologizes यांनी शुक्रवारी (दि. 12) पुण्यात केले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी Ajit Pawar apologizes तातडीने लक्ष घालून एमपीएससीला सूचना केल्या. त्यानुसार एमपीएससीने नवीन परिपत्रक काढल्याचेही ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते. त्यात एमपीएससी कुठंतरी कमी पडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली हे दुर्दैव आहे. एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती. सरकार काहीतरी वेगळ करत आहे, हे भासविण्याचे काम विरोधकांनी केले असून चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान एमपीएसीने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यात कोणताही बदल केला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार असून 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.