Ajit Pawar | रवी राणा यांच्या उद्धव ठाकरेंवरील आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया (VIDEO)

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Ajit Pawar | उमेश कोल्हे या तरुणाच्या हत्येप्रकरणी अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोल्हेच्या हत्येचे प्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून पोलिस आयुक्तांना फोन केला होता, असा आरोप राणांनी केला. तसेच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास चुकीच्या देशेने नेण्यात उद्धव ठाकरे सरकारचा हात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशीची मागणी राणा (Ravi Rana) यांनी केली सभागृहात केली होती. तसेच त्यांनी महाविकास आघाडीवर देखील आरोप केले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कुणाच्या संदर्भात जर काही चुकीची घटना घडली असेल, तर त्याप्रकरणी नि:पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. कोणीही राज्यकर्त्या विरोधात जरी आरोप झाले, तरी त्याचा तपास झाला पाहिजे, अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे आणि आता देखील आहे. जर कोणी चूक केली असेल, तर त्यावर कोणाला पांघरून घालण्याचे कारण नाही. याप्रकरणी कुणावरही अन्याय होणार नाही. याची चौकशी करून वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल, असे पवार (Ajit Pawar) म्हणाले.
मुळात अशा प्रकरणात अगोदर रान उठवले जाते आणि नंतर तपासात काहीतरी वेगळेच सिद्ध होते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात देखील किती लोकांनी रान उठवले होते.
नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करून ती आत्महत्या होती हे सिद्ध केले.
त्यामुळे आधीच रान उठवणे योग्य नाही. काल परवा एयू वरून देखील किती वाद आणि आरोप सुरू होते.
त्यातही तपास झाला आणि एयू म्हणजे अनन्या उदास नाव समोर आले आहे, असे पवारांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar’s first reaction to Ravi Rana’s allegation against Uddhav Thackeray (VIDEO)
हे देखील वाचा :
Ram Kadam | …तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही – राम कदमांची प्रतिज्ञा
Comments are closed.