बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgn’s) आणि काजोल ( Kajol) यांची मुलगी न्यासा (Nysa Devgan) लाईमलाईटपासून दूर असते. सोशल मीडियावर ती सुपर अॅक्टिव्ह असते. मीडियापासून दूर असली तरीही न्यासा कायमच चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. खास करून फोटो(Ajay Devgn’s) आणि व्हिडिओंमुळं ती अटेंशन घेत असते. सध्या न्यासा तिच्या बोल्ड अंदाजामुळं चर्चेत आली आहे. तिचा व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या सोशलवर चर्चेत आहे.
न्यासानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती फ्रेंड्ससोबत डान्स करताना दिसत आहे. यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं क्रॉप टॉप घातला आहे. व्हिडिओत न्यासा तिची नवीन हेअरस्टाल फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक आणि बोल्ड अंदाज आवडला आहे.
न्यासाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
न्यासा सध्या आपल्या शिक्षणासाठी सिंगापूरमध्ये आहे. तिच्यासोबत तिची आई काजोलदेखील आहे. काही दिवसांपूर्वीच काजोल न्यासासाठी सिंगापूरला शिफ्ट झाली आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, काजोल न्यासाला एकटीला सिंगापूरला पाठवणार नव्हती. ठराविक काळासाठी ती आता मुलगी न्यासासोबत राहणार आहे. याशिवाय त्यांचा मुलगा युग हा अजय जवळच मुंबईत राहत आहे.