वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – चीननंतर आता अमेरिकेने इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही प्रक्षेपित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने बुधवारी तीन निशस्त्र क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. हे चाचणी प्रक्षेपण कॅलिफोर्नियाच्या वॅनड्रेनबर्ग येथे झाले. ‘हे प्रक्षेपण सहा महिन्यांपूर्वी आयोजित केले गेले होते. अमेरिकेची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘मिंटमॅन’ म्हणून ओळखले जाते. ते जवळजवळ ५० वर्ष जुने आहेत. तसेच चाचणी प्रक्षेपणातून त्याची गुणवत्ता तपासली जाते,’ अशी माहिती अमेरिकन हवाई दलाने दिली.
या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात अण्वस्त्र चर्चा सुरू होणार आहे. परंतु बुधवारी उत्तर कोरियाने हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. असे म्हटले जात आहे की, बहुदा ही पाणबुडीने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणाले की, बुधवारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सापडला. हे क्षेपणास्त्र ४५० किलोमीटर अंतरावर टाकण्यात आले.
याआधी मंगळवारी चीनने कम्युनिस्ट राजवटीची ७० वर्षे पूर्ण झाल्यावर सैन्य परेड काढून शक्ती प्रदर्शन केले होते. यावेळी चीनने प्रथमच जगाला आपले सर्वात प्राणघातक इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डीएफ -४१ देखील दाखवले. त्याचवेळी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, कोणतीही शक्ती महान राष्ट्राला हादरवू शकत नाही. चीनला वाढण्यास कोणीही रोखू शकत नाही असेही ते म्हणाले.
Visit : bahujannama.com