नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट तसेच रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणा केली. हा दर अनुक्रमे 4% आणि 3.35% वर पहिल्या प्रमाणे कायम राहील. चलन धोरण समिती (एमपीसी) च्या 2 जून, 2021 ते 4 जून, 2021 पर्यंत चाललेया बैठकीनंतर ही घोषणा झाली.
(RBI) आरबीआयने (RBI) लागोपाठ सहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
महागाई नियंत्रित करण्यासाठी तसेच ती एमपीसीच्या 4% च्या लक्ष्याजवळ ठेवण्याच्या उद्देशाने रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
याशिवाय, सध्या अतिशय कमजोर झालेली आर्थिक स्थिती पाहता या उपायांनी बाजारात रोकडचा प्रवाह वाढवण्यास मदत मिळू शकते.
मात्र, यामुळे लोकांसाठी कर्ज घेणे खुप सोपे झाले आहे,
परंतु सर्व फायनान्ससरवर डिपॉझिट रेट कमी करण्याचा मोठा दबाव आहे.
संपूर्ण जगाची सध्याची स्थिती पाहता लोकांच्या समोर बचतीचे महत्व पुन्हा स्पष्ट झाले आहे.
गुंतवणुकदारांसाठी आपली बचत वाढवण्यासाठी उच्च एफडी दरावर गुंतवणूक करणे महत्वाचे आहे.
एफडी का आहे चांगला पर्याय
मागील दोन वर्षापासून एफडीवर व्याजदर जवळपास स्थित आहेत.
अशावेळी एफडी गुंतवणुकीबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे.
कोणत्या पद्धतीने जास्त रिटर्न मिळू शकते.
एफडीमध्ये गुंतवणुक करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय आहेत.
कुठे किती मिळत आहे व्याज जाणून घेवूयात…
कंपनी आणि व्याजदर
– बजाज फायनान्स – 6.75%
– एसबीआय – 5.40%
– आयसीआयसीआय – 5.50%
– एचडीएफसी बँक – 5.50%
– पंजाब नॅशनल बँक – 5.25%
कृपया हे देखील वाचा:
3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजी विक्रेत्याचा मृतदेह आढळला नदीच्या पात्रात
Paytm ची खास ऑफर ! घराचे आणि दुकानाचे भाडे भरा अन् मिळवा 10 हजार रुपयाचा ‘कॅशबॅक’
1 सप्टेंबरपासून सुरु होणार शैक्षणिक वर्ष
‘कोरोना’ हा घरात घुसलेला शत्रू, त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे : मुंबई उच्च न्यायालय