बहुजननामा ऑनलाइन टीम – केरळच्या कुन्नाथूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाने बारमध्ये झालेल्या वादानंतर एका व्यक्तीच्या गुप्तांगाचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (दि.6) रात्री घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, कुन्नाथरूमधील एका बारमध्ये शरीफने रागाच्या भरता सुलेमानवर (वय-55) हल्ला केला आणि त्याच्या गुप्तांगाचा दाताने जोरात चावा घेतला.
पोलिसांनी शरीफला अटक केली आहे. तर सुलेमान यांना त्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. आपत्कालीन शस्त्रक्रियेने सुलेमानचे गुप्तांग परत जोडण्यात आले आहे. शरीफ हा पेरुम्बादप्पू येथे राहणार आहे. तर सुलेमान हा रिहाईश पुन्नूक्कवु येथे राहणारे आहेत. ही विचित्र घटना शनिवारी रात्री घडली आहे. शनिवारी रात्री आरोपी शरीफ ज्या ऑटोटॅक्सीने बारमध्ये पोहचला. त्यापूर्वी एका पार्किंग केलेल्या कारला टॅक्सीने धडक दिल्याने वाद सुरु झाले.
दरम्यान, शरीफ आक्रमक झाला. लोकांनी त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सर्वांवर धावून जात होता. त्याचवेळी शरीफने सुलेमानच्या गुप्तांगाचा दाताने चावा घेतला. शरीफची समजूत काढताना बार मालक आणि काही कर्मचारी जखमी झाले. शरीफने यापूर्वी देखील दारुच्या नशेत गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन आरोपीला ताब्यात घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले. पहिल्या अशाच एका घटनेत कोर्टाने शरीफला खडसावले होते.