बहुजननामा ऑनलाईन – निफाड -सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असालेल्या सावळीत मोठया संख्येने मोरांचा संचार आहे सायखेडा-सिन्नर रस्त्यालगत असलेल्या शेतात आपल्या जोडीदारा सोबत भ्रमंती करत असतांना
दिडमहिण्यापुर्वि झाडांच्या फांद्यात पाय अडकुन मोर अपघात ग्रस्त झाला होता या मोरावर वनविभागाने उपचार करत मोर आणि लांडोराची भेट घडवली असुन आपल्या अपघातातुन सावरलेल्या जोडीदाराची लांडोर काळजी घेतांना दिसत आहे
निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात मोर आणि लांडोराची जोडी स्वचंदी मनाने विहार करत असतांच अनाहुत पणे मोराचा पाय झुडपात अडकला आन मोर स्वतःची सुटका करत असताना मोराचा पाय मांडीमध्ये मोडल्याने मोराला उडता येईन त्यामुळे मोर जागेवरच पडून होता त्या मोराबरोबर लांडुर होती ती मोराच्या भावती फिरून उडण्याचं मोराला बळ देत होती पण बिचाऱ्या मोराला वेदना होत असल्याने सांगू कोणाला आणि बोलू कोणाला असे या मोराला झाले होते त्याच वेळी रस्त्याने जात असताना हा सर्व प्रकार सावळी गावातील संजीव गिरीगोसावी या पक्षीमित्राने बघितले जखमी झालेल्या मोराला घरी आणून अन्न, पाणी दिले वनविभागाला सर्व माहिती देत नाशिक येथे नेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नेत तपासणी केली असतात मोराची पायाची मांडी मोडल्याने पायाला प्लास्टर केले आहे निफाड येथील वनविभागाच्या ताब्यात दिले असता वन विभागाचे अधिकारी डॉ सुजित नेवसे, संजय भंडारी आणि सहकारी यांनी वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करत मोराला सावळी शिवारातील संजीव गिरी यांच्या मळ्यात नुकतेच सोडले अन मोर आणि लांडूरचा मिलाप घडवुन आणला असता आनंदाने आपल्या जोडीदाराची लांडोराने भेट घेत आवाज केला दरम्यान परतुन आलेल्या साथीदाराची लांडोर काळजी घेत आसुन संजिव गिरी यांचे कुटुंबिय मोर आणि लांडोराचे दाणा पानी करत सेवाश्रुषा करत आहे.
प्रतिक्रिया-
संजय भंडारी वनपरीक्षेत्र अधिकारी
गेल्या दिड महिण्या पासुन आपल्या जोडीदाराच्या विरहात व्याकुळ झालेला लांडुर गिरी यांचे घरावर ,अंगणात आवाज देत वाट पहात होता. त्याच्यावर निफाड आणि नाशिक येथे उपचार केल्या नंतर तो बरा झाल्याने त्याच्या आधिवासात सोडले असुन मोर आणि लांडोराची भेट घडवुन आणल्याचे आम्हाला निश्चितच समाधान आहे
प्रतिक्रिया –
संजीव गिरी बेरवाडी
उपचारानंतर जखमी मोराला सावळीतील आमच्या वस्ती परीसरात वन विभागाने सोडले आहे दिड महिने नित्य नियमाने आपल्या साथिदाराची वाट पहात असलेल्या लांडोराने भावविभोर होत अवाज केला आहे सध्या मोर आणि लांडोराची जोडी आमच्या वस्ति परीसरातच आसुन मि आणि माझे कुटुंबिय त्याचे काळजी