बहुजननामा ऑनलाईन टीम – अभिनेता अक्षय कुमार यांचा आतेभाऊ आणि ’कहानी घर घर की’ आणि सोनी टिव्हीवरील ’लज्जा’ मध्ये अभिनयाची छाप टाकणार्या अभिनेता सचिन कुमार याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अंधेरीतील त्याच्या घरी त्याचे निधन झाले.
सचिन गुरुवारी झोपण्यासाठी बेडरुममध्ये गेला होता. दुसर्या दिवशी सकाळी उशीरापर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. सचिनच्या आई-वडिलांनी दुसर्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी सचिन त्यांना मृतावस्थेत आढळून आला.’ विशेष म्हणजे सचिन कुमारने काही वर्षापूर्वी अभिनयात यश न मिळाल्याने प्रोफेशनल फोटोग्राफी सुरु केली होती. यामध्ये तो आनंदी देखील होता. राकेश पॉल आणि सचिनची मैत्री दोन दशकांपासूनची आहे. आम्ही अभिनयाच्या दुनियेत स्ट्रगलची सुरुवात सोबतच केली. आम्ही नेहमी संपर्कात होतो. मात्र मागील पाच वर्षात आम्ही भेटू शकलो नाही. आम्ही भेटण्याचा प्लान करायचो मात्र काही कारणांनी ते राहून जात होते. आता तो मला न भेटताच निघून गेल्याचेच राकेशने सांगितले. ’लज्जा’ मालिकेचे निर्माते बेनाफर कोहली यांनी देखील सचिन कुमारच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सचिन नेहमी हसणारा आणि गोड स्वभावाचा व्यक्ती होता. त्याच्या अचानक जाण्याने धक्का बसला आहे.