बंगळुरू : वृत्तसंस्था – ग्लोबल टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी फर्म एक्सेंचर (Accenture) जगभरातील सुमारे 25 हजार लोकांना किंवा ग्लोबल वर्कफोर्सच्या जवळपास 5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची शक्यता आहे. कंपनीच्या कर्मचारी कपातीचा परिणाम भारतात देखील होणार आहे. भारतात Accenture मध्ये सुमारे दोन लाख कर्मचारी आहेत.
ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूने याबाबत ऑगस्टमध्ये सूचित केले होते. Accenture चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युली स्वीट यांनी कर्मचाऱ्यांच्या बैठकीचा हवाला देत कपातीबाबत सांगितले होते, असे ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूने म्हटले आहे. भारतात काम करणारे कर्मचारी हे कंपनीला टेक्नॉलॉजीसाठी कर्मचाऱ्यांचे हब बनवते. शिवाय जगभरात कंपनीचे 5 लाख कर्मचारी आहेत. दरम्यान Accenture इंडियाच्या प्रवक्त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूने म्हटले आहे की, या महिन्यात इंटरनल ग्लोबल स्टाफ मीटिंग ऑनलाइन स्ट्रीम केले आहे. ज्यामध्ये सबकॉन्ट्रॅक्ट्स आणि नवीन भारती थांबवण्याशिवाय कंपनीला अजूनही कर्मचारी कमी करावे लागण्याची शक्यता आहे, असे Accenture च्या ज्युली स्वीट यांनी म्हटले आहे. रिपोर्टनुसार, चार्जेबिलिटी किंवा कर्मचाऱ्यांना कमाच्या तासांचे वेतन, एका दशकात पहिल्यांदा 90 टक्क्यांपेक्षा कमी केले आहे.