नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि माहिती व तंत्रज्ञान (आयटी) तज्ञ् विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक अबिदाली झेड नीमचवाला यांनी राजीनामा दिला आहे. विप्रोने म्हटलं आहे की कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नीमचवाला यांनी राजीनामा दिला आहे, परंतु पुढील सीईओची नेमणूक होईपर्यंत ते पदावर राहतील.
कंपनीने म्हटले आहे की 52 वर्षीय नीमचवाला त्याच्या जागी नवीन नियुक्ती होईपर्यंत या पदावर ते कायम राहतील.असे करण्यामागील हेतू असा आहे की कंपनीच्या कार्यावर परिणाम होऊ नये. कौटुंबिक कारणामुळे नीमचवाला यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. नेतृत्व आणि योगदानाबद्दल कंपनीने नीमाचलवाला यांचे आभार मानले आहेत. विप्रोमध्ये सेवा करणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे नीमचवाला म्हणाले. याबद्दल त्यांनी अझीम प्रेमजींचे आभार मानले. याबाबतचे ट्विट विप्रो कडून करण्यात आले आहे.
विप्रो ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महसुलाद्वारे क्रमांक ३ ची कंपनी आहे. सिक्स्-सिग्मा, एस.इ.आय.-सी.एम.एम., बी.एस.-१५००० ही गुणवत्तेची विविध आंतरराष्ट्रीय मानांकने विप्रोच्या विकसन केंद्रांना प्रदान करण्यात आली आहेत.