नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) हे मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहे त्यामुळे त्यांचे डोके तपासून घ्यावे. आतापर्यंत राऊत जे बोलले आहेत ते खरे झाले का, असा प्रश्न करत त्यांचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. कृषी विभागाच्या बैठकीच्या (Agriculture Department) निमित्ताने अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नागपुरमध्ये आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुढे म्हणाले, संजय राऊत यांच्या बोलण्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नियंत्रण राहिलेले नाही. ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेली शिवसेना ही मुळातच बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) राहिली नाही. त्यामुळे राऊत बाळासाहेबांचे विचार सोडून बोलत आहेत. त्यांचे तर आता डोके फिरले असून त्यांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, असा सल्ला सत्तार यांनी दिला. जोपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्यासोबत आहेत. तोपर्यंत कुणीही किती धमक्या दिल्या तरी आमचे काहीही होणार नाही असा टोला सत्तार यांनी लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) आणि आमची दोस्ती 25 वर्षांपासून कायम आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना बदलून विखे-पाटलांना मुख्यमंत्री करा, असे मी म्हटले नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये येणार की नाही हे माहित नाही. परंतु आले तरी त्यानंतर आमची भूमिका काय राहणार यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी एका मुलाखतीत शिंदेंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. यावर सत्तार म्हणाले, शिंदे हे टायगर आहेत. सामान्यांचे नेते आहेत. यामुळे त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असे सत्तार म्हणाले.
Web Title :- Abdul Sattar | Maharashtra Minister abdul sattar advice uddhav thackeray about mental health check up of sanjay raut
हे देखील वाचा :
Pune Pimpri Chinchwad Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून गावठी पिस्तुल बाळगणार्याला अटक
Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप