मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना ‘भावी मुख्यमंत्री’ कोण? अशी चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. विखे पाटील यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) व्हावं का? असा प्रश्न अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, आपला मित्र मोठा व्हावा असं कुणाला वाटत नाही, विखे पाटील यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षाही मोठ व्हावं, असं सत्तार यांनी म्हटलं. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आलं. तर भावी मुख्यमंत्र्याच्या नावाच्या यादीत आता आणखी एका नावाची चर्चा पुढे आली आहे.
मी हनुमान असतो तर…
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, मी हनुमान असतो तर छाती फाडून दाखवलं असतं की माझ्या हृदयात विखे पाटील आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारला असता सत्तार म्हणाले, आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांनी विखे पाटलांना महसूल खातं दिले आहे. विखे पाटील त्यात (Maharashtra Political News) चागलं काम करत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मी हे नवे बदल पाहतोय
सत्तार पुढे म्हणाले, महसूल खात्याची महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. या विभागात अत्याधुनिक बदल होत आहेत. मी इतक्या दिवसांपासून राजकारणात आहे. मी हे नवे बदल पाहतोय. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले, कोणाला वाटणार नाही आपला मित्र काहीतरी व्हावा. मी तर म्हणतो मुख्यमंत्री पदापेक्षा त्यांनी पुढे जावं. तसेच ते अडचणीत येतील असे कोणतेही प्रश्न विचारु नका, असे ही सत्तार म्हणाले.
Web Title :- Abdul Sattar | abdul sattar says radhakrishna vikhe patil should rise high beyond cm post
हे देखील वाचा :
Pune RPO News | पुणे : येत्या शनिवारी पासपोर्ट मेळावा