बहुजननामा ऑनलाईन – Aai Kuthe Kay Karte | अभिनेते मिलिंद गवळी यांची एक पोस्ट वायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून मिलिंद गवळी (Milind Gawali) यांना खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आणि अनिरुद्धची भूमिका उत्तमपणे साकारत त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की मिलिंद गवळी सायकलिंग करताना छान फिरताना दिसत आहेत आणि त्यांनी याला हटके कॅप्शन देखील दिले आहे. (Aai Kuthe Kay Karte)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिलिंद गवळीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सुट्टीचे महत्त्व सांगितले आहे. एवढेच नाही तर एक अभिनेता म्हणून सुट्टी कधी आणि किती मिळावी याबाबत देखील त्यांनी खुलासा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी सुट्टींची स्वतःच्या कामाबरोबर देखील तुलना केली आहे. एखाद्या अभिनेत्याला सुट्टी मिळाल्यावर होणारा आनंद त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना जोडून सांगितले आहे. सध्या मिलिंद गवळीचे हे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Aai Kuthe Kay Karte)
सोशल मीडियावर मिलिंद गवळी यांची ही पोस्ट चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते मिलिंद गवळी हे अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आजवर हिंदी माध्यमांमध्ये देखील काम केले आहे. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Aai Kuthe Kay Karte | aai kuthe kay karte milind gawali aka aniruddha share vacation post
हे देखील वाचा :
Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
IPL 2023: बीसीसीआयनं IPL रजिस्ट्रेशनसाठी खेळाडूंना दिली ‘हि’ डेडलाईन
Janhvi Kapoor | जान्हवीने धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहर बद्दल केले ‘हे’ मोठे विधान